हार्दिक जोशीची पोस्ट
“ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीये, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्यासोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. Miss you @jyoti.naisha माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको, Always love you always khup khup miss you”, असे हार्दिक जोशीने म्हटले आहे.” (Social Media)