मराठी चित्रपट महोत्सव, ८ पारितोषिके घोषित

सोमवार, 3 एप्रिल 2017 (09:34 IST)
५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस, तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.
 
अंतिम फेरीसाठी ‘एक अलबेला’, ‘सायकल’, ‘बंदुक्या’, ‘कासव’, ‘डॉ. रमाबाई राऊत’, ‘दशक्रिया’, ‘टेक केअर गुड नाइट’, ‘व्हेन्टीलेटर‘, ‘ओली की सुकी’, ‘कर्मवीरायण’ या १० चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम 
 
पदार्पण चित्रपट निर्मितीकरिता ‘घुमा’, ‘सायकल’ आणि ‘कर्मवीरायण’ या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी ‘ओली की सुकी’, ‘टेक केअर गुड नाइट’ आणि ‘दशक्रिया’ यांचे नामांकन करण्यात आले आहे.
 
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ५१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५४व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक 
 
फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले. घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, हे पुरस्कार ३० एप्रिल २०१७ 
 
रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

वेबदुनिया वर वाचा