Baipan Bhaari Deva Movie review : केदार शिंदेचा बाईपण भारी देवा रिव्ह्यू

मंगळवार, 4 जुलै 2023 (16:09 IST)
केदार शिंदे चा बाईपण भारी देवा या चित्रपटाची कथा साधी सरळ आहे. ही कथा आहे किरकोळ कारणांवरून दुरावलेल्या आणि दुखावलेल्या बहिणींची. हा चित्रपट त्यांच्यातील नात्यांची पुनर्भेट आहे.असं म्हणतात की बाईला समजून घ्यायचं असेल तर बाईचा जन्म घ्यावा. बाई स्वतःचा विचार न करता पूर्णपणे आपल्या संसारात दुसऱ्यांसाठी गुरफटून जाते. एकीकडे बाईला देवीचे स्वरूप देऊन तिची पूजा केली जाते तर दुसरीकडे तिचा शारीरिक आणि मानसिक छळदेखील केला जातो. खरं तर बाई आणि पुरुष संसाराचे दोन चाक आहे. बाईमुळे संसाराचा तोल साधला जातो असे म्हणणे चुकीचे नसेल. बाईपण भारी देवा हा चित्रपट आहे सहा बहिणींचा   

 या चित्रपटातील कलाकार मंडळी दमदार असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवतो. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukunya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब चौधरी (Deepa Parab) या साऱ्यांनीच कमाल केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे आणि लेखिका वैशाली नाईक यांनी साधा सरळ पारिवारिक ड्रामा  प्रेक्षकांसमोर मांडला आहे जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो. 

वेगवेगळ्या वयोगटातील, भिन्न भिन्न मानसिकता, परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांचं वर्णन लेखिकेने लिहिलं आहे. चित्रपटात कथा, उपकथानकांचा मोठा गोतावळा आहे. चित्रपट बघताना सहा अभिनेत्रींची जुगलबंदी बघायला मिळते या सहाही बहिणींचे वेगळे वेगळे स्वभाव आहे. कोणाचं कोणाशी पटत नाही.

या बहिणींच्या आयुष्यातील संघर्ष बघायला मिळतो. वंदना गुप्ते, यांनी बऱ्याच वर्षांनी अभिनयाची एकहाती भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी कथानकाचा आधार आहे. सुकन्या मोने यांची एनर्जी दिसून येते. तर दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर या दोन वेगळ्या स्वभावाला दर्शवतात. कला दिग्दर्शकाने छान चित्रपट दिला आहे. चित्रपटाचे संवाद आणि पटकथा उत्तम आहे. तांत्रिक बाजू भक्कम दिसली आहे. साई पियुष या जोडीचं संगीत आणि मयूर हरदासांचे संकलन वासुदेव राणेंचा कॅमेरा उत्तम आहे. कुटुंबियांसह या चित्रपटाचा आनंद घेण्यासारखा हा चित्रपट आहे.   
 
 
  Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती