जितेंद्र जोशी विनोदवीर समीर चौगुलेबरोबर तो स्किट सादर करणार

बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (08:00 IST)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या कार्य्रक्रमातील कलाकारांचेदेखील अनेक दिग्गज लोकांनी कौतूक केले आहे. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार येत असतात. आता अभिनेता जितेंद्र जोशी या कार्यक्रमात दिसणार आहे. विशेष म्हणजे तो या कार्यक्रमात एका स्किटमध्ये दिसणार आहे.
 
अभिनेता कवी जितेंद्र जोशी त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशसाठी तो या कार्यक्रमात हजर राहणार आहे. विनोदवीर समीर चौगुलेबरोबर तो स्किट सादर करणार आहे. सोनी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती