आपल्या नृत्याने तरुणाईला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळे शहरात बेवारस मरणासन्न अवस्थेत आढळले. त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी रुग्णालयात दाखल केले त्यांची ओळख त्यांच्या जवळ असलेल्या आधारकार्डावरून कळली. त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यावर ते गौतमी पाटीलची वडील असल्याची ओळख मिळाली.
धुळ्यात दोन दिवसांपूर्वी तिचे वडील मरणासन्न अवस्थेत सापडले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या खिशातून सापडलेल्या आधारकार्डावरून ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समजले. नंतर गौतमी पर्यंत ही बातमी गेल्यावर तिने माणुसकीच्या नात्याने आपल्या वडिलांची जबाबदारी घेत त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने वडिलांना चांगल्या उपचारासाठी पुण्यात नेले आहे. आणि वडिलांच्या उपचाराचा सर्व खर्च ती स्वता घेणार असल्याचे तिने सांगितले.