डॉ अमोल कोल्हे वाढदिवस विशेष : अंभिनेते ते राजकारणी पर्यंतचा प्रवास

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (09:38 IST)
डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत.त्यांनी स्टार प्रवाह वरील मालिका 'राजा शिवछत्रपती 'मध्ये छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारून प्रसिद्ध झाले. 2019 मध्य ते शिरूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 
 
डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळ नारायणगाव येथे झाला.त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.त्यांनी विज्ञान शाखेत अध्ययन घेतले.नंतर ते MBBS ची पदवी घेण्यासाठी मुंबईत आले.यांच्या पत्नी देखील डॉ.असून वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहे.डॉ कोल्हे हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात.त्यांच्या इतिहासाची माहिती घराघरात पोहोचावी या साठी त्यांनी आपले घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली.
 
डॉ. अमोल कोल्हे हे 2016 साली पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते  पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत.2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी  फेब्रुवारी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी त्यांची निवड झाली.त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती