12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट दशावतार रिलीज झाला. या चित्रपटात मल्टीस्टारकास्ट असून हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर चांगलाच गाजत आहे.
दशावतार या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. सोमवारी देखील या चित्रपटाने चांगलेच कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने एकूण चार दिवसातंच 6.23 कोटी रुपये कमावले आहे.
हा चित्रपट मल्टीस्टारर असून दिलीप प्रभावळकर व्यतिरिक्त महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर हे कलाकार देखील आहे.