“एक आहे चिरंजीव, एक आहे चि. सौं. का., श्री आणि सौ.च्या आधी, चि. व. चि. सौं. का...” असे गीताचे बोल आहे. पण यात एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे या गीतामध्ये कोणतेही वाद्य वापरण्यात आलेले नाही. यात वाद्यांचे आवाज तोंडाने काढलेले स्वर आहे. हे गाणं स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. आणि वाद्यांचा प्रयोग न करता तोंडातून वाद्यांचे आवाज काढणे हेच या गाण्याची विशेषता आहे.
नरेंद्र भिडे यांनी या गीताला संगीत दिले असून परेश मोकाशी यांचे बोल आहे. गाण्याच्या चित्रीकरणात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पूर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष दिसून येत आहे.