अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांना न्यायालयाचा दणका

शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (19:05 IST)
अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना पुण्यात महामंडळाच्या वतीने मानाचा मुजरा सांस्कृतिक कार्यक्रमात अनावश्यक खर्च केल्याचा दंड म्हणून त्यांना सहा आठवड्यात 11 लाख रुपयांचा दंड मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजी आणि माजी पदाधिकारी आणि संचालकांना ठोठावला आहे. 
 
प्रकरण असे आहे की, पुण्यात चित्रपट महामंडळाच्या वतीने 10 वर्षापूर्वी 2012 -2013 साली मानाचा मुजरा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी तत्कालीन संचालकांनी बोगस खर्च दाखवून रकम घेतल्याचा आरोप सभासदांनी केलं असून जी रकम चुकीच्या पद्धतीने खर्च केली आहे,ती वसूल करण्यात यावी. अशी मागणी केली. धर्मादाय आयुक्तांनी संचालकांना आणि पदाधिकाऱ्यांना तातडीनं 11 लाख रुपये भरण्याचा दंड दिला आहे. त्यांना ही रकम सहा आठवड्यात भरावी लागेल असे निर्देश देण्यात आले आहेत. संचालक गटामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, सतीश रणदिवे, अनिल निकम, संजीव नाईक, बाळकृष्ण बारामती, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी आणि रवींद्र बोरगावकर यांना मुंबई न्यायालयाने दंड सुनावला आहे.  या संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता याचिका दाखल केली.परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचे आदेश दिले.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती