घायल, दामिनी, घातक, खाकी सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहे.
टीझरच्या सुरुवातीलाच चिन्मय मांडलेकर म्हणजेच नथुराम गोडसे महात्मा गांधीं समोर येतो. हिंदू राष्ट्राला वाचवण्यासाठी तुमच्यासोबत विचारांचे युद्ध करणार असल्याचे तो सांगतो. तेव्हा महात्मा गांधी म्हणतात, विचारांच्या युद्धात हत्यार नाही तर विचारांचा वापर होतो. चित्रपटात ए आर रहमान (A R Rehman) यांनी म्युझिक दिले आहे ज्याची झलक टीझरमध्ये दिसते. गांधी गोडसे एक युद्ध चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार हे नक्की. अभिनेते दीपक एंटनी (Deepak Antany) यांनी महात्मा गांधी यांची भुमिका साकारली आहे.