सुरांच्या महामंचावर रंगणार रेडिओ जॉकीजबरोबर मैफल…

शनिवार, 9 डिसेंबर 2023 (10:39 IST)
कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या पर्वात खूप काही नवीन पाहायला मिळतं. गाण्यांबरोबरच नवीन कन्सेप्ट्सचे एपिसोड ही अनुभवायला मिळत आहेत. या आठवड्यात RJ स्पेशल हा विशेष भाग घेऊन आले आहे. या अत्यंत अद्वितीय भागात रेड एफएम, रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, आणि बिग एफएम या प्रसिद्ध रेडिओ स्टेशन्सचे RJs सामील होणार आहेत. RJ श्रुती, RJ द्यानेश्वरी, RJ शोनाली, आणि RJ दिलीप सज्ज आहेत सुरांच्या महामंचावर. या धमाल एपिसोडमध्ये, या चार RJs त्यांच्या अत्यंत रंगीन आनंदाजाने सर्वांचे मनोरंजन करतील. या भागाचे विशेष म्हणजे RJs प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट घेऊन आले असून ‘सुर नवा ध्यास नवा’चे स्पर्धक तेच गाणे सादर करतील असा अनोखा कन्सेप्ट पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात घडतोय. जेव्हा आपली प्लेलिस्ट या महामंचावर सादर होईल हा अनुभव अगदीच कमाल असणार आहे. RJ श्रुती, RJ ज्ञानेश्वरी, RJ शोनाली, आणि RJ दिलीप यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लागले आहेत. या महामंचावरचे वातावरण आणखीनच संगीतमय आणि आनंदमय होणार आहे. हा एपिसोड फक्त संगीत नव्याने सादर करणारा नसून एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुरांच्या या महामंचावरची धमाल नक्की *पाहा , सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा, शनि -रवि , रात्री ९.०० वा. आवडत्या कलर्स मराठीवर.*

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती