व्हिलानोव्ह पॅलेस नाताळसाठी सजला

गुरूवार, 25 डिसेंबर 2014 (10:54 IST)
पोलंडची राजधानी वार्सा येथील व्हिलानोव्ह पॅलेस नाताळसाठी सजला असून येथे अत्यंत आकर्षक रोषणाई केली गेली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी दूर दूरच्या ठिकाणाहून पर्यटक येथे आतापासूनच गर्दी करू लागले आहेत. सतराव्या शतकात किंग जॉन तिसरा सोबेस्की याने हा महाल बांधला आणि त्याच्यानंतर राज्यावर आलेल्या अनेक राजांनी त्या बांधकामात भर घातली. 
 
हा पॅलेस त्याच्या आकर्षक बांधकामासाठी संपूर्ण युरोपात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे पहिल्या व दुसर्‍या जागतिक महायुद्धात आणि पोलंडच्या फाळणीतही हा पॅलेस टिकून राहिला आणि आज तो पोलंडचा ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखला जातो. 
 
महत्त्वपूर्ण ऐतिहासिक इमारतीतील हा मुख्य राजवाडा 2006 साली इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ युरोपियन रॉयल रेसिडेन्सीचा सदस्य बनला आहे. या राजवाडय़ाबरोबरच पोलंडमधील अन्य इमारती व चर्चेसही नाताळसाठी सजली असून येथील बाजारपेठही नाताळ खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत

वेबदुनिया वर वाचा