येस बँकेच्या वाधवान बंधूंच्या सीबीआय कोठडीत १० मेपर्यंत वाढ

शनिवार, 9 मे 2020 (06:28 IST)
येस बँकेच्या गैरव्यवहाराप्रकरणी डीएचएफएल प्रमोटर्सचे कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज यांना गुन्हे अन्वेषण विभागाची (सीबीआय) १० मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी सीबीआयकच्या विशेष न्यायालयाकडून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.

वाधवान बंधूना आज शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कोठडीत १० मे पर्यंत वाढ करण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच वाधवान बंधूंचे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी असलेले संबंध आणि येस बँक प्रकरणी सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
वाधवान बंधूनी येस बँकेच्या ३७००० कोटी कर्ज मंजुरीच्या बदल्यात बँकेचे संस्थापक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांच्या परदेशातील बँक खात्यावर ६०० कोटीची लाच दिल्याचे तपासातून उघड झाले आहे. यानुसार मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्यान्वये वाधवान बंधूंवर सीबीआयने ७ मार्चला गुन्हा दाखल केला आहे. तसंच १७ मार्चला दोघांविरुद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी केलं होतं. दरम्यान, गेल्या रविवारी सीबीआयने वाधवान बंधूना साताऱ्यातून ताब्यात घेतलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती