यामाहा ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, अनोख्या लुकसह नवीनतम वैशिष्ट्ये

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (13:56 IST)
सध्या जगभरात पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे आणि प्रदूषणावर आळा घालण्यासाठी  इलेक्ट्रिक दुचाकींना बंपर मागणी आहे आणि अशा परिस्थितीत, यामाहा मोटर्सने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EMF लॉन्च केली आहे. कंपनीने आता ताईवानी कंपनी गोगोरोच्या( गोगोरो )सहकार्याने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहे, ज्यामध्ये नवीनतम वैशिष्ट्ये तसेच स्वेपेबल बॅटरी तंत्रज्ञान मिळत आहे. असे मानले जाते की यामाहा च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सर्वप्रथम तैवान मध्ये सुरू होईल आणि त्याची किंमत भारतीय चलनात सुमारे 2.77 लाख रुपये असेल.
 
यामाहा यावर्षी भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ज्या प्रकारे हिरो  मोटोकॉर्प  देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे आणि टीव्हीएस -बजाज  सह इतर कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी आहे, अशा प्रकारे यामाहा  लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर करू शकते.  यामाहा EMF इलेक्ट्रिक स्कूटर ही एक अतिशय अनोखी डिझाईन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी आधुनिक शैलीचा तसेच पॉवरचा कॉम्बो आहे.
 
यामाहा EMF मध्ये अनेक नवीन फीचर्स
डार्क ब्लॅक, डार्क ग्रीन आणि लाईट ब्लू कलर पर्यायांसह सादर करण्यात आले आहेत. यात ड्युअल एलडी हेडलॅम्प, ट्रेंडी रीअर व्ह्यू मिरर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सिंगल पीस सीट, ड्युअल एलईडी टेललाइट्स मिळतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात एनएफसी कार्ड कंट्रोल ऑन-ऑफ, लास्ट पार्किंग लोकेशन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यासह इतर अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यामाहाची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिड-माउंटेड  इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल, जी 10.3 PS पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करेल. ते केवळ 3.5 सेकंदात 0-50 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यामाहा  EMF च्या बॅटरी रेंजचा उल्लेख अद्याप केलेला नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती