काय म्हणता, अजूनही टेस्ला महाराष्ट्रात येण्याच्या आशा कायम

गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:05 IST)
राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी टेस्ला महाराष्ट्रात येण्याच्या आशा अजूनही कायम असल्याचं  विधान केलं आहे. “टेस्लाने रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली असली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

यासोबतच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे टेस्लासह ई-वाहन कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ट्विटरद्वारे रोहित पवारांनी ही माहिती दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती