आय टी क्षेत्रातील कंपन्यांनी एच 1-बी व्हिसाचे नियम मोडले

आपल्या देशातील आय टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि जगात मोठा व्यवसाय करत असलेल्या कंपन्यांनी व्हिसा नियम तोडले आहेत. यामध्ये  टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्याचा समावेश असून त्यांनी “एच 1-बी’ व्हिसाचे नियम मोडल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. लॉटरीसाठी अनावश्‍यकपणे अधिक तिकीटे या कंपन्यांनी पाठवले होते आणि त्या द्वारे जास्तीचा वाटा त्यांनी घेतला असे अमेरिकेने म्हटले आहे.
 
एच1-बी व्हिसाचे वार्षिक मानधन 60 हजार ते 65 हजार डॉलर इतके आहे. या कंपन्यांनाच “एच 1- बी’ व्हिसांतर्गत अमेरिकेत काम करण्याची सर्वाधिक संधी मिळत असते.“एच1-बी’ व्हिसा मिळवणाऱ्या आणि अमेरिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांपेक्षा निम्म्यापेक्षा कमी मानधन मिळते. हा “एच 1- बी’ व्हिसाच्या संकेत नियमांचा भंग आहे, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आधीच ट्रंप सरकार इतर देशातील कामगारांच्या विरोधात आहे त्यातही अश्या जर चुका समोर आल्या तर देशाला आणि विदेशातील असलेल्या भारतीयांना मोठा आर्थिक फटका आणि अमेरिका सोडावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा