डाउनलोड केल्यानंतर हे अॅप सुरू करण्यासाठी सर्व्हिस प्रोवाइडर निवडावा लागतो, त्यानंतर मोबाइल नंबर, सब्सक्राइबर ID किंवा सेट-टॉप-बॉक्स नंबर टाकण्याची आवश्यकता आहे. यानंतर युजरला त्याच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टीव्ही स्क्रीनवरही दिसेल. या अॅपमध्ये सब्सक्राइबरच्या अकाउंटबाबत, एकूण उपलब्ध असलेल्या चॅनेल्सबाबत, सब्सक्राइबरने कोणते चॅनेल्स निवडले आहेत, अकाउंट बॅलेन्स किती आहे अशी सर्व माहिती मिळते. सध्या काही आघाडीचे डीटीएच ऑपरेटर्स या अॅपसोबत जोडले गेले आहेत. पण ग्राहकांच्या सुविधेसाठी लवकरच अन्य डीटीएच ऑपरेटर्सचाही यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ट्रायने सांगितलं.