यंदाच्या हंगामात उत्तर महराष्ट्रात टोमॅटोचे चांगले उत्पादन निघाले आहे. हा टोमॅटो विदेशात देखील पाठवला जातो. मात्र देशात सुरु असलेया नोट बंदीमुळे व्यवहार करतांना शेतकऱ्याना अनेक अडचणी जाणवत आहेत. याशिवाय पाकिस्तानातमध्ये मोठ्याप्रमाणात टोमॅटो निर्यात केला जातो. मात्र बदलत्या भारत पाक संबंधामुळे निर्यात संपूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे शेतकऱ्याला टोमॅटो पिकवण्यासाठी प्रति एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च होत असतो. मात्र आजच्या बाजारभावानुसार टोमॅटोच्या विक्रीनंतर खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.