डाळीचे भाव गगनाला भिडले

सोमवार, 8 एप्रिल 2024 (11:13 IST)
वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. साखर, तांदूळ, धान्य तूरडाळ नंतर उडीद डाळीचे भाव वधारले आहे.सध्या ठोक बाजारात तूरडाळ 165 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 180 ते 185 रुपये किलो आहे. येत्या महिन्यात तूर डाळीचे भाव वधारण्याची शक्यता असून तूर डाळीचे दर 210 रुपये ते 220 रुपये किलो होण्याची शक्यता आहे. निवडणुका जवळ आल्या आहे. या साठी खाद्यतेलासह डाळीचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रत्यन करत असताना त्यावर रोख लागली आहे. याचे कारण म्हणजे पाम तेल उत्पादक देश इंडोनेशिया ने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. तूर डाळीचे उत्पादन पावसामुळे कमी झाल्याने तूर डाळीच्या दरात वाढ होत आहे. 

तूरडाळीचे दर पाठोपाठ मूगडाळीचे दर वधारले आहे. मुगाची डाळ ठोक बाजारात 108 ते 122 रुपयांनी किलो या दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात 1 किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना 140 ते 145 रुपये द्यावे लागत आहे. उडीद मोगरचे भाव ही वधारले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती