पेट्रोलचे भाव वाढले त्याला राज्य शासन जबाबदार आहे. राज्य शासन सर्वाधिक पन्नास टक्के कर आकारत आहे. जर हे कर कमी केले तर राज्यात पेट्रोलचे दर ७५ रुपये लीटर होई, असा दावा माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वसईत भेट दिली. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध मुद्यांवर राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकार सर्वाधिक कर आकारत आहे. त्यांनी कर कमी केल्यास पेट्रोल ७५ रुपयांनी मिळेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निवडणुकीतील पराजयाला घाबरत असल्याने त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.