गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शेतकर्यांकडून करण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात गोकुळने दोन वेळा प्रति प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ दिली होती. पण त्यावेळी दूध विक्री दरात वाढ करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दरही भरमसाठ वाढल्याने गोकुळच्या वाहतूक खर्चामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.