सुनील मित्तल यांनी घोषित केलेली रक्कम ही भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू, दुर्बल, वंचित घटकांपर्यत पोहोचवली जाणार आहे. दरम्यान सुनील मित्तल यांनी २०२१ साली सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. हे विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा पुरस्कार करणारे हे विद्यापीठ असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.