सोयाबीनला मिळत नाही भाव

पावसाने फटका देऊनही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक आलं आहे. या सोयाबीनची लातूरच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. आवक मोठी असली तरी भाव मात्र तीन हजार रुपयांच्या पुढे जायला तयार नाहीत. या सोयाबीनपासून तेल तयार करणार्यार लातुरातील कंपन्यांही हे सोयाबीन सोयाबीन घ्यायला तयार नाहीत. हे सोयाबीन ओले आहे. यातून उतारा मिळत नाही असं व्यापार्र्‍यांचं म्हणणं आहे. 
 
आगामी काळात सोयाबीनचा भाव ३२०० रुपयांच्या पुढे जाणार नाही असं बाजार समिती सांगते. तर शेतकर्यां नी बाजारात एकदम माल आणू नये दमाने आणावा असं आडते किशोर बिदादा सांगतात. मागच्या वर्षी २० हजार क्विंटलची आवक होती. यंदा मात्र ३५ ते ४० हजार क्विंटलची आवक आहे.

वेबदुनिया वर वाचा