लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) तसंच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटच्या व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. बदललेले व्याजदर 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत लागू राहतील.
अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या एका सर्क्युलरनुसार, वेगवेगळ्या बचत योजनांच्या व्याजदरांत 0.30 टक्क्यांपासून 0.40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीय. पाच वर्षांचं डिपॉझिट, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ आणि पीपीएफ यांसारख्या इतर योजनांच्या व्याजदरांत 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. या दरवाढीनंतर पीपीएफ आणि एनएससीवर 8 टक्क्यांचं व्याज मिळेल. तर सुकन्या समृद्धी योजनेवर आता 8.5 टक्के आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.7 टक्क्यांचं व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदरांत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत आणि ते 4 टक्के राहील.