PPF, बचत पत्र , किसान विकास पत्रासाठी आधार नंबर आवश्यक

शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:08 IST)

बॅंक खाते, मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन आणि इतरही महत्वाच्या सुविधांना आधार लिंक करून घेतल्यानंतर आता सरकारने आता पोस्टातील बचत खात्यांसाठी बायोमेट्रिक ओळख संख्या देणे अनिवार्य केली आहे. आता पोस्ट ऑफसमध्ये लोक भविष्य निधी(PPF), राष्ट्रीय बचत पत्र(NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) साठी आपला आधार नंबर देणे आवश्यक आहे. खातेदारांना आता १२ अंकी आधार क्रमांक आपल्या पोस्ट खात्यातील अकाऊंटसोबत जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

अर्थ मंत्रालयाने चार वेगवेगळ्या अधिसूचना जारी करून सर्वच पोस्ट ऑफिस जमा खाते, पीपीईएफ, एनएससी आणि केवीपी खाते उघडण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे. २९ सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीला आधार नंबर मिळाला नसेल तर त्यांनी त्यांच्या आधार नामांकनचं प्रमाण द्यावे लागेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती