शेअर बाजार; तेजीची घोडदौड सुरूच राहणार ?

सोमवार, 20 जुलै 2020 (11:41 IST)
गेल्या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. यात इन्फ्रा, ऊर्जा, बँकिंग Infra, energy, banking स्टॉक्सनी नफ्याचे नेतृत्व केले. निफ्टीने शुक्रवारी १.५१ टक्के किंवा १६१.७५ अंकांची वृद्धी घेतली व तो १०,९०१.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ५४८.४६ अंकांची वाढ घेऊन ३७,०२०.१४ अंकांवर बंद झाला होता. तेजीचा हा ट्रेंड चालू आठवड्यात कायम राहील,असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
 
सध्या बाजारात तिमाही निकालांची चलती आहे. काही बड्या कोर्पोरेट्सनी पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रावारी बीपीसीएल (१२.४३ टक्के), ओएनजीसी (५.८४ टक्के), भारती इन्फ्राटेल (४.३२ टक्के) आणि टायटन (३.७१ टक्के) हेनिफ्टीतील टॉप गेनर्स ठरले तर हिंडाल्को इंडस्ट्रिज (१.९० टक्के), ब्रिटानियया इंडस्ट्रिज (१.८६ टक्के), नेस्ले (१.४७ टक्के), टीसीएस (१.२० टक्के) आणि इन्फोसिस (०.५९ टक्के) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी क्षेत्र वगळता आज सर्व सेक्टरल निर्देशांकात सकारात्मक व्यापार झाला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे १.५५ टक्के आणि १.११ टक्के वाढ अनुभवल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले. चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७५.०२ रुपयांवर स्थिरावला.
 
देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. आता देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ११ लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३८,९०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात कोरोना रूग्णांच्या संख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याच वेळी २४ तासांत कोरोनाने ५४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत ६ लाख ७७ हजार ४२३ जण करोनामुक्त झाले आहेत.
 
कोव्हिड-१९ संसर्गाची वाढती संख्या आणि अमेरिका-चीनदरम्यानचा वाढता तणाव, अशा स्थितीतही जागतिक बाजाराने शुक्रवारच्या व्यापारी सत्रात मजबूत स्थिती दर्शवली.'एफटीएसई १००' ने ०.५६ टक्के आणि एफटीएसई एमआयबीने ०.०१ टक्क्यांनी वृद्धी दर्शवली. हँगसेंगनेही ०.४७ टक्क्यांची वाढ घेतली तर नॅसडॅक आणि निक्केई २२५ कंपनीने अनुक्रमे ०.७३ टक्के आणि ०.३२ टक्क्यांनी घट अनुभवली.
 
एलअँडटी फायनान्स होल्डिंग लि.: एलअँडटी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेडचे शेअर्स ३.५१ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ६१.८५ रुपयांवर ट्रेड केला. २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ७३ टक्क्यांची घट झाली. उच्च आकस्मिक तरतुदींमुळे ही घसरण झाली.
 
कॅडिला हेल्थकेअर Cadillac Healthcare : कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडच्या स्टॉक्समध्ये ४.६३ टक्क्यांची वाढ झाली व त्यांनी ३७७.६० रुपयांवर ट्रेड केला. कंपनीला कोव्हिडवरील उपचारांसाठी पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा-२ बीच्या मेक्सिकोतील क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता मिळाली. त्यानंतर स्टॉक्सवर हे परिणाम दिसून आले.
 
ब्रिटानिया इंडस्ट्रीज : ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा २ ०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ५४२.६ कोटी रुपये आणि महसूल ३४२०.७ कोटी रुपये नोंदवला गेला. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.८६ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ३७८३.०० रुपयांवर व्यापार केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती