या टोमॅटोच्या बिया 3 कोटी रुपये किलो ! जाणून घ्या खासियत

Tomato seeds cost 3 crore सध्या देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत पूर्वी 60 रुपये किलो असलेला टोमॅटो आता 200 ते 300 रुपये किलो मिळत आहे. अशात टोमॅटो आता एक सामान्य माणासाच्या आवक्याबाहेर गेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का टोमॅटोचे बियाणे 3 कोटी रुपयांना उपलब्ध आहे. नसेल तर आज आम्ही तुम्हाला या टोमॅटोच्या बियाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.
 
कोणत्या टोमॅटोच्या बिया इतक्या महाग
आम्ही सांगत आहोत हाजेरा जेनेटिक्स Hazera Genetics द्वारा विकल्या जाणार्‍या बियांबद्दल. या पद्धतीच्या टोमॅटोच्या बियांची किंमत सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त आहे. तुम्हालाही टोमॅटोचे हे खास बियाणे विकत घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सुमारे 3 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
 
हे टोमॅटोचे बियाणे महाग का आहे
या टोमॅटोच्या बियापासून सुमारे 20 किलो टोमॅटो तयार होऊ शकतात. तसेच त्याचे फळ देखील खूप महाग आहे. या बियाण्यापासून वाढलेल्या टोमॅटोला बिया नसतात. हे टोमॅटो इतर टोमॅटोपेक्षा जास्त चवदार असतात. त्यामुळेच त्याचे बियाणे इतके महाग आहे. जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांना हे फळ खायला आवडते.
 
युरोपियन लोकांना हा टोमॅटो खायला आवडतो
या टोमॅटोची मागणी परदेशात खूप आहे. विशेषतः युरोपमध्ये हा टोमॅटो खूप आवडतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार फक्त 1 बियापासून 20 किलो टोमॅटो पिकवता येतो. जे इतर कोणत्याही बियाण्याने शक्य नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती