Reliance Jioचा तिमाही नफा 24 टक्क्यांनी वाढला, 4,173 कोटींचा शुद्ध नफा

शुक्रवार, 6 मे 2022 (20:29 IST)
अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने जानेवारी-मार्च 2022 च्या चौथ्या तिमाहीत स्टँडअलोन नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ नोंदवून 4,173 कोटी रुपयांची नोंद केली आहे.
 
कंपनीच्या स्टॉक एक्स्चेंजच्या फाइलिंगनुसार, कंपनीला एका वर्षापूर्वी याच कालावधीत 3,360 कोटी रुपयांचा करानंतर नफा झाला होता. रिलायन्स जिओचा 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील करानंतरचा एकत्रित नफा आर्थिक वर्ष 21 मधील 12,071 कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास 23 टक्क्यांनी वाढून 14,854 कोटी रुपये झाला आहे.
 
कंपनीने स्टँडअलोन कमाईतही विक्रम केला आहे. कंपनीचा स्टँडअलोन महसूल मार्च 2021 मध्ये 17,358 कोटी रुपयांवरून 20 टक्क्यांनी वाढून मार्च 2022 मध्ये 20,901 कोटी रुपये झाला. वार्षिक परिचालन महसुलात 10.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे, मार्च 2021 मधील 70,127 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च 2022 मध्ये ते 77,356 कोटी रुपये होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती