बाजारात हापूस आंब्यांची आवक वाढल्याने हापूस आंब्याचे दर घसरले

शुक्रवार, 6 मे 2022 (10:41 IST)
नवी मुंबईत एमपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे हापूस आंब्याचे दर घसरले आहे. मार्केट मध्ये सुमारे 90 हजार हापूस आंब्यांच्या पेट्या आल्या आहेत. दीड ते दोन हजार रुपयांनी मिळणाऱ्या हापूस आंब्याचे दर आता 200 ते 500 रुपये डझन ने मिळत आहे. त्यामुळे हापूस आंबा प्रेमींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. हापूस आंब्याबरोबर, पायरी, बदामी आणि केसर आंब्यांची देखील आवक वाढली आहे. 
त्यामुळे आता हापूस आंबा सर्वसामान्य माणसाला परवडणारा आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती