कोरोनाच्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन आरबीआय ने आपल्या रेपो दर,रिव्हर्स दरांमध्ये कोणतीही बदल न केल्याचे समजत आहे. त्यामुळे रेपोदर 4 टक्के तर रिव्हर्स दर 3.35 टक्केच राहणार.मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना सांगितलं की, चालू आर्थिक वर्षात विकास दर हा 9.5 टक्के असू शकतो.या पूर्वी तो 10.5 टक्के राहण्याची शक्यता आहे.या वर्षात महागाई दर15.1 टक्के असू शकतो.
।
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक समाप्त झाली आहे. त्यानंतर आरबीआयनं आपले आर्थिक धोरण जाहीर केलं आहे. कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून त्यात 2020-21 या वर्षासाठी 7.3 ने घसरण झाली.