Petrol and Diesel Price Today 32 दिवसांत 18 व्या वेळेस इंधन दरवाढ

शुक्रवार, 4 जून 2021 (11:42 IST)
नवी दिल्ली- दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढून नवीन विक्रम पातळीवर गेले. 4 मे पासून आतापर्यंत 18 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वृद्धी झाली आहे जेव्हाकी 14 दिवस किमतीत कोणताही बदल नव्हता. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोल 4.36 रुपये तर डिझेल 4.93 रुपये महागले आहे।
 
मुंबई मध्ये आज पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी वाढ होऊन ती प्रतिलीटर 100.98 रूपये झाली आहे तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढून 92.99 रूपये झाले आहेत. 
कोलकाता मध्ये पेट्रोल 26 पैशांनी वाढलं आहे तर डिझेल 28 पैशांनी वधारलं आहे.
चैन्नईमध्ये पेट्रोलने आतापर्यंत उच्चांकी 96.23 प्रतिलीटर असा दर गाठला आहे तर डिझेल 90.38 रूपये प्रतिलीटर आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ झाली आहे. येथे एक लिटर पेट्रोल 94.76 रूपये आणि डिझेलचे एक लिटर 85.66 रुपये झाले.
 
नवा दर 
दिल्ली- पेट्रोल प्रतिलीटर 94.76 रूपये,  डिझेल प्रतिलीटर रूपये 86.66
कोलकाता- पेट्रोल प्रतिलीटर 94.76, डिझेल प्रतिलीटर रूपये 88.51
मुंबई- पेट्रोल प्रतिलीटर 100.98, डिझेल प्रतिलीटर रूपये 92.99
चैन्नई- पेट्रोल प्रतिलीटर 96.23, डिझेल प्रतिलीटर रूपये 90.38
 
दररोज सहा वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 
या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. ग्राहकांना कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने ग्राहकांना स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.
आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या.
 
एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेता येतात. इंडियनऑयलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड लिहावा लागेल आणि त्या क्रमांकावर 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती