‘टाटा समूहा’त रोज नवनवीन घडामोडी वेगाने घडत आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्ताचे टाटा सन्सने खंडन केले आहे.
सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे आली. मात्र, ते आता टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आज मीडियामध्ये धडकले. मात्र, सध्यातरी अध्यक्षपद सोडणार नाही, असे रतन टाटांनी स्पष्ट केले आहे.
मीडियामध्ये यासंबंधी आलेल्या वृत्तामध्ये काही विश्वस्तांचा हवाला देण्यात आला आहे. ते विश्वस्त भविष्यात टाटा ट्रस्टचा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत. कारण नेतृत्व निवडीच्या स्तरावर होणारे संभाव्य बदल सूनियोजित आणि सोप्या पद्धतीने होऊ शकतील, असेही टाटा ट्रस्टने म्हटले आहे.