रेल्वे आरक्षण प्रणाली पुढचे सात दिवस बंद

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (11:57 IST)
रेल्वे प्रशासनाने गाड्यांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरू आहे.
 
त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्ययावत केली जात आहे. हे काम 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान रात्री साडे अकरा ते पहाटे साडे पाच या वेळेत केले जाणार आहे. त्यामुळे सहा तास आरक्षण प्रणाली बंद असणार आहे. प्रवाशांना या वेळेत आरक्षित तिकीट काढता येणार नाही. ऑनलाईन व आरक्षण केंद्रावरून देखील या वेळेत तिकीट सुविधा बंद असणार आहे.
 
कोव्हिड पूर्वीचे रेल्वेचे क्रमांक व अन्य सुविधा प्रवाशांना बहाल करण्यासाठी क्रिस हि संस्था आरक्षण प्रणालीत बदल करीत आहे. त्यासाठी आरक्षण प्रणाली पुढचे सात दिवस बंद ठेवली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती