कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये सर्वच शेतमाल उत्पादकांबरोबर आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ग्राहकांपर्यंत फळांचा राजा पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध केला आहे. आता ऑनलाईन पद्धतीने आंबा घराघरात पोहचणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी आंबा महोत्सव घेते. यंदा देखील महोत्सव खंडित न करता ऑनलाइन खरेदी करता येईल.
आंबा खरेदीकरिता किमान मर्यादा 100 डझन असणार आहे. एकत्रित मागणीमुळे आंबा घरपोच देणे सोयीचे तसेच आंबा थेट सोसायटीमध्ये पोहोचवता यावा यासाठी वाहन व्यवस्था देखील उपलब्ध आहे. या सुविधेसाठी ग्राहकांनी कृषी पणन मंडळाच्या पोर्टलवरील माहितीद्वारे खरेदीदार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपली मागणी एकत्रित नोंदवावी. किंवा आंबा उत्पादकांशी संपर्क करून खरेदीसाठी मागणी नोंदवता येईल.