पुनावाला फायनान्स कंपनी :अदर पुनावाला यांनी मुंढव्यात घेतले 464 कोटींचे 13 फ्लोअर

शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:52 IST)
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचेअदर पुनावालायांनी पुनावाला फायनान्ससाठी पुण्यातील मुंढव्यातील कमर्शियल टॉवरमध्ये ४६४ कोटींचे १३ फ्लोअर विकत घेतले आहेत. नुकतेच त्यांनी २७ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. अलीकडील बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून  ही इमारत खरेदी केली असल्याचे सांगितले  जात आहे.
 
सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाबरोबरच अदर पुनावाला हे पूनावाला फिनकॉर्प  या कंपनीचेही अध्यक्ष आहेत.
त्यांनी कंपनीसाठी या कमर्शिअल इमारत खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केला आहे.१९ मजल्यांची ही इमारत असून त्यापैकी १३ मजले पूनावाला यांनी खरेदी केले आहेत.याच इमारतीत यापूर्वी पहिला व दुसरा मजला खरेदी केला होता.त्यानंतर आता झालेल्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग पूनावाला यांच्या मालकीची झाली आहे.N Main Rd इथं AP ८१ हा टॉवर उभारलेला आहे.प्रिस्टीन प्रॉपर्टीजने २०१९ मध्ये येथे १५० कोटींचा व्यवहार करत पाच एकर जागा खरेदी करून १९ मजली टॉवर उभारला होता.सध्या या टॉवरमधील ६० टक्के भाग पूनावाला यांच्याकडे आहे.तर उर्वरित भागात फूट कार्पेट ऑफिस एरिया, कार आणि बाईकसाठी राखीव पार्किंग आहे.कोरोना प्रतिबंधक लस पूनावाला यांच्या सीरमने सर्वप्रथम तयार केली होती.त्यामुळे जगभरात सीरम इंस्टीट्यूट हे नाव पोहोचले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती