100 टक्के Margin Rule लागू, जग कसे बदलेल ते जाणून घ्या

गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (17:25 IST)
100% मार्जिनचा नियम 1 सप्टेंबरपासून पूर्णपणे लागू असून आता पूर्ण मार्जिन रोख आणि FNO मध्ये भरावे लागेल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) मध्ये व्यापार करणाऱ्यांना आता मार्जिन म्हणून अधिक निधी ठेवावा लागेल. आता पीक मार्जिन म्हणून 100 टक्के मार्जिन अपफ्रंट ठेवावे लागेल. जे एकाच दिवशी म्हणजेच इंट्राडे मध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री करतात त्यांना देखील 100 टक्के मार्जिनची आवश्यकता असेल. पूर्वी 75 टक्के मार्जिन अग्रिम आवश्यक होते.
 
सोप्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्या व्यापाऱ्याला 10 लाख रुपयांचा निफ्टी करार खरेदी करायचा असेल तर त्याला आता 20 टक्के मार्जिन 2 लाख रुपये ठेवावे लागेल. पण पूर्वी फक्त 1.50 लाख रुपयांचे मार्जिन ठेवणे आवश्यक होते.
 
जाणून घ्या- पीक मार्जिन म्हणजे काय?
गेल्या वर्षीपर्यंत ट्रेडिंग सत्राच्या शेवटी मार्जिन आकारले जात होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही काल F&O मध्ये 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्ही आजच्या बाजार सत्रामध्ये अतिरिक्त 1 कोटी रुपये गुंतवू शकत होता. जुन्या व्यवस्थेत 1 कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीसाठी वेगळे मार्जिन भरावे लागत नव्हते. म्हणजेच, कालच्या बाजार सत्रापासून ते आजच्या बाजार सत्रादरम्यान, तुम्ही F&O मध्ये फक्त 1 कोटी रुपयांच्या फरकाने 2 कोटी रुपये गुंतवू शकत होता. पण नवीन नियमानुसार, तुम्हाला अतिरिक्त 1 कोटी रुपयांचे मार्जिन देखील भरावे लागेल.
 
सेबीने गेल्या वर्षी पीक मार्जिन प्रणाली सुरू केली होती. त्याची चार टप्प्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अतिरिक्त 1 कोटी रुपयांवर 25% मार्जिन आकारण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 50 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 75 टक्के आणि चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून लागू झाला. यामध्ये 100% अग्रिम मार्जिन भरावे लागेल.
 
SEBI का बदलले नियम?
बाजाराचे बदलत असलेलं पैलू लक्षात घेऊन सेबीने ही जोखीम व्यवस्थापन चौकट तयार केली आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सेबीने रिस्क मॅनेजमेंट रिव्ह्यू कमिटी (RMRC) शी सल्लामसलत केली होती. तथापि, दलाल संघटना ANMI या बदलावर खूश नाही आणि त्यात अनेक बदल करण्याची मागणी करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती