पेट्रोलच्या दरात 28 पैसे, डिझेलमध्ये 24 पैशांची वाढ

शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (10:05 IST)
इंधनाच्या दरात आजही वाढ झाली आहे. पेट्रोलच्यादरात 28 पैस आणि डिझेलच्या दरांमध्येही 24 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 28 आणि डिझेलचे दर 22 पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.  इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे?, कुठे आहेत अच्छे दिन?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती