Petrol Price Today : पेट्रोलचे दर पुन्हा भडकले, दिल्लीत शतकापासून काही पैसे दूर

शुक्रवार, 2 जुलै 2021 (09:17 IST)
Petrol Diesel Price Today 2nd July 2021: आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 40 पैशांची वाढ केली आहे, तर डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या वाढीनंतर आता चेन्नईमध्येही पेट्रोल 100 च्या वर गेले आहे, तर दिल्ली आणि कोलकातामध्ये शतकापासून काही पैसे दूर आहेत. शुक्रवारी दिल्लीतील इंडियन ऑईलच्या पंपावरील पेट्रोल 99.16 रुपये प्रति लिटरवर गेले, परंतु डिझेल 89.18 रुपये प्रति लीटर राहिले.
 
कच्च्या तेलाने जवळपास दोन टक्के उडी घेतली
अमेरिकेतील तेलाच्या साठ्यात घट झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाने गुरुवारी जवळपास दोन टक्क्यांची वाढ नोंदवली. लंडनचा ब्रेंट क्रूड फ्यूचर्स 1.41 डॉलर किंवा 1.89 टक्क्यांनी वाढून 76.03 डॉलर प्रति बॅरल झाला. ऑगस्ट महिन्यातील अमेरिकी क्रूड फ्यूचर्स 1.67  डॉलर किंवा 2.27 टक्क्यांनी वाढून 75.14 डॉलर प्रति बॅरल होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती