पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG) आणि वित्त मंत्रालय उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी सलग सहाव्या दिवशी तेलाच्या किमतीत बदल केलेला नाही. 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली होती. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारे वाढ होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग होऊ शकतात. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांनी 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. तेव्हापासून आतापर्यंत तेल 10 रुपयांनी महागले आहे. मात्र, 7 एप्रिलपासून कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही.