सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळेल, जाणून घ्या प्रधानमंत्री वय वंदन योजनेशी संबंधित सर्व डीटेल्स

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:22 IST)
PMVVY: लोक नेहमी निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल चिंतित असतात. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदन योजना सुरू केली. जर तुम्ही या मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा पेन्शनच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळेल. जाणून घेऊया डीटेल्स- 
 
या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये आहे. जर पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत दोन्ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत जास्तीत जास्त दहा वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. निवृत्तीवेतनधारकांना 3 वर्षे पूर्ण केल्यानंतर कर्जाची सुविधाही मिळेल.
गुंतवणूक कशी करावी
या योजनेसाठी तुम्हाला LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. किंवा आपण एजंटच्या माध्यमातून याचा लाभ देखील घेऊ शकता. जर तुम्ही हा विमा ऑफलाईन खरेदी केला, तर तुम्हाला ते परत करण्यासाठी 15 दिवस असतील, तर ऑनलाईन खरेदी करताना 1 महिना असेल.
योजना काय आहे
जर कोणत्याही व्यक्तीने 1,62,162 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 10 वर्षांसाठी दरमहा 1 हजार रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर कोणी 15 लाख रुपये गुंतवले तर त्याला 9,250 रुपये मिळतील. परंतु सावधगिरी बाळगा की एकदा आपण पेमेंट पर्याय निवडला की तो पुन्हा बदलता येणार नाही. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती