अर्थ मंत्रालयाकडून तब्बल 11 लाख पॅन कार्ड रद्द

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:35 IST)

अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर रद्द केले आहेत. पॅन कार्ड हे प्रत्येकाचं आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसह अनेक आर्थिक व्यवहार पॅन कार्डशिवाय होत नाहीत. मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅन कार्ड असल्याचं आढळून आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने पॅन कार्ड रद्द केले आहेत.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2017 पर्यंत एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द करण्यात आले. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. मात्र कर वाचवण्यासाठी अनेक जण एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवतात. त्यामुळेच सरकारने आता पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा