पॅन कार्डला आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेकांना पॅन कार्डला आधार कार्डशी संलग्न करण्यात बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नावाच्या स्पेलिंग वेगवेगळ्या असल्याने समस्या उद्भवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता ही प्रक्रिया सरळ आणि सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला यासाठी फक्त पॅन कार्डची एक स्कॅन केलेली प्रत द्यावी लागेल. आयकर विभागाकड़न यासाठी ऑनलाइन पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली आहे.