सध्या इंटरनेट हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. मात्र तरीही आपल्या देशात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अध्ययनानुसार भारतात केवळ 29 टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात. स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2017: चिल्ड्रेन इन ए डिजिटल वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागात महिलांवर अनेक प्रकारची बंधने असतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे लिंगभेद.
या अहवालानुसार जगभरात 2017 मध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या 12 टक्के अधिक आहे. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या एक तृतीयांश कमी आहे. मात्र डिजिटल जगापासून मुलींना दूर ठेवण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी इंटरनेट स्पीडचे विश्लेषण करणार्या संस्थेने ओपन सिग्नलचे नवे रिपोर्ट सादर केले होते. त्यात 4 जी एलटीई स्पीडमध्ये भारत 77 देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. या वर्षी जूनमध्ये भारत 75 देशांमध्ये 74 व्या स्थानावर होता, तर शेवटच्या स्थानावर कोस्टा रिका हा देश होता. मात्र तो देखील आता भारतापुढे गेला आहे. भारतात 4 जी स्पीड 6.13 एम बीपीएस आहे. जगाचा विचार केला तर आपल्याला 4 जी मध्ये 3 जीचा स्पीड मिळत आहे.