ईपीएफओच्या कार्यालयांना सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन एप्रिलपासून ऑनलाइन पीएफ काढण्यास सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे. ऑनलाइन सेवा सुरु झाली की ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सध्या पीएफ काढण्यासाठी पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तो कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटकडे जमा करावा लागतो. नंतर तो फॉर्म ईपीएफओ कार्यालयात जातो, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे ऑनलाइन ऑपशन चांगला आहे.