'भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा'च्या (ट्राय) नियमानुसार, महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागते. यात १०० चॅनेल दिले जातात. मात्र, त्यावरील प्रत्येक चॅनेलसाठी अतिरिक्त पैसे आणि त्यावर सेवाकर आकारण्यात आले. त्यात प्रत्येक चॅनेलचे वेगवेगळे पॅकेज आणि ग्राहकांच्या पसंतीचे चॅनेल मिळून केबलसाठी दरमहा किमान ४०० ते एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने नवीन पॅकेज जाहीर केले. ग्राहकांना आता केवळ १३० रुपयांमध्ये १५० टीव्ही चॅनेल पहायला मिळणार आहे.