होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या या मॉडेल की किंमत 54325 (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीने स्कूटर आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट केले आहे. याची बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे. कंपनीने अॅक्टिव्हा 5G यात पोझिशन लँपसह ऑल एलईडी हेडलॅम्प व्यतिरिक्त नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये अधिक बदल करण्यात आलेला नाही.