उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दरवाढ केली

मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (16:25 IST)
देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. बुधवारपासून अमूलचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. मदर डेअरीनेही दुधाच्या दरात दोन  दोन रुपयांनी वाढ केली आहे. वाढलेले दर बुधवारपासून लागू होणार आहेत. यापूर्वी 6 मार्च रोजी मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली होती. 
 
वाढलेले दर उद्यापासून लागू होणार आहेत  
गुजरातसह संपूर्ण भारतात 17 ऑगस्टपासून अमूलचे दूध महाग होणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)दुधाच्या दरात वाढ केली आहे. आता 500 मिली अमूल गोल्डची किंमत 31 रुपयांपर्यंत वाढणार आहे. आता ग्राहकांना अमूल ताझाचे 500 मिली पॅकेट 25 रुपयांना आणि अमूल शक्तीचे 500 मिली पॅकेट 28  रुपयांना मिळणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती