Varghese Kurian: श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, ज्यांनी भारताला दूध उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवून दिला

शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (14:19 IST)
Twitter
'मिल्क मॅन ऑफ इंडिया'
श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी 1949 ला दूध उत्पादन क्षेत्रात सहभाग घेतला. 9 सप्टेंबर 2012मध्ये त्यांच निधन झालं. त्यांच्याबद्दलच्या जाणून घेऊया या खास गोष्टी.
नॅशनल मिल्क डे
देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना मांडणाऱ्या कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो.
दूध नावडता पदार्थ
डॉ. कुरियन यांना दूध अजिबातच आवडत नव्हते. पण कालांतराने त्यांनीच दूध उत्पादनात क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला.
'मिल्कमॅन ऑफ इंडिया' पुरस्काराने सम्नानित
म्हशीच्या दूधाची पावडर बनवण्याचे श्रेयही डॉ. कुरियन यांना जाते. याआधी गायीच्या दूधापासून पावडर तयार केली जायची. पण कुरियन यांनी केलेल्या या नव्या प्रयोगामुळे त्यांना 'मिल्कमॅन ऑफ इंडिया'चा किताब मिळाला.
दूधाचा महापूर
डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर ही योजना राबविली. या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
अमूलची स्थापना
डेअरी प्रोडक्टमध्ये अग्रेसर असलेल्या अमूलची स्थापना डॉ.कुरियन यांनी केली
एनबीटीचे अध्यक्ष
अमूलची लोकप्रियता बघून माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूलचा विस्तार करायचे ठरवले. त्यासाठी 1965 रोजी 'राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड'ची स्थापना केली आणि डॉ.कुरियन यांना त्या परिषदेचे अध्यक्ष बनवले.
मंथन चित्रपट
श्याम बेनेगल यांनी डॉ.कुरियन यांच्या सहकार चळवळीवर अधारित 'मंथन' चित्रपट तयार केला होता.
अनेक पुरस्कारांनी गौरव
डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली. रेमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
मानद पदवी बहाल केली
1965 मध्ये मिशिगन विद्यापीठाने कुरियन यांना मानद पदवी बहाल केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती