मारुती सुझुकी कंपनीने स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत. या सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018 या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने या गाड्या परत मागवल्या आहेत.