आपल्याकडे भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) पॉलिसी आहे आणि मॅच्योर होणार असेल तर लगेच आपलं बँक खाते पॉलिसीशी लिंक करवण्याची गरज आहे. जर खाते लिंक केले गेले नाही तर आपला पैसा अडकू शकतो. भारतीय जीवन विमा निगम आतापर्यंत चेकद्वारे पॉलिसी भुगतान करण्यात येत होतं परंतू आता पैसा थेट बँक खात्यात ट्रांसफर केला जाईल. यामुळे पॉलिसीला बँक खात्याशी लिंक करवण्याची गरज आहे. 1 मार्च 2019 आधीच पॉलिसीला बँक खात्याने लिंक आणि मोबाइल नंबर रजिस्टर करवून घेणे योग्य ठरेल.
भारतीय जीवन विमा निगमने आपल्या पॉलिसी होल्डर्सला सूचित करणे सुरू केले आहे. या व्यतिरिक्त एलआयसी आपल्या सर्व सेवा आता डिजीटल करू पाहत आहे. 1 मार्च 2019 पासून प्रत्येक ग्राहकाला ऑटोमेटेड एसएमएस द्वारे पॉलिसी प्रीमियम, पॉलिसी मॅच्योरिटी, पॉलिसी होल्ड सारख्या माहिती पुरवण्यात येतील.
या प्रकारे करू शकता मोबाइल नंबर रजिस्टर
मोबाइल नंबर रजिस्टर करवण्यासाठी आपण एजंटला कॉल करू शकता आणि आपण एलआयसीच्या वेबसाइटवर www.licindia.in/Customer-Services/Help-Us-To-Serve-You-Better जाऊन किंवा हेल्पलाइन नंबर 022-68276827 वर कॉल करून रजिस्टर करवू शकता. यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही.